Latest

लतादीदींच्या वस्त्रांना नाशिकचा साज ; एन. भास्करराव यांच्या शिवण कौशल्याची भुरळ

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; कंचुकी ऊर्फ चोळी, ब्लाउजच्या व्यवसायात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून 1930 च्या दशकात नावारूपास आलेले एन. भास्करराव अर्थात भास्करराव नागवंशी यांच्या कपडे शिवणकामाची भुरळ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना होती.

1950-51 च्या सुमारास लता मंगेशकर यांनी ब्लाउज ओव्हरकोट भास्कररावांकडून शिवून घेतला अन् तेव्हापासून लतादीदी त्यांच्याकडून ब्लाउज शिवून घेत होत्या. नाशिकमध्ये मार्तंडशेठ नागवंशी त्या काळी कोटमेकर म्हणून प्रसिद्ध होते. राजेबहाद्दर लेनमध्ये त्यांचे छोटेसे टेलरिंगचे दुकान होते. भास्करराव मार्तंडशेठचे चिरंजीव. वडिलांचा विरोध असतानाही भास्कररावांनी 1930 मध्ये यशवंत व्यायामशाळेसमोर आपला टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला होता. तत्पूर्वी त्यांनी मुंबई गाठून ब्लाउज कटिंगकाम शिकून घेतले होते. त्यानंतर नाशिकला येऊन 'ब्लाउज स्पेशालिस्ट' म्हणूनच आपला ठसा उमटविला. पुढे त्यांचा लौकिक इतका दूरवर पोहोचला की, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी त्यांच्याकडून कपडे विशेषत: ब्लाउज शिवून घ्यायच्या. 1950-51 च्या सुमारास लतादीदींनीही त्यांच्याकडून ब्लाउज व ओव्हरकोट शिवून घेतला होता. त्यांना तो इतका आवडला होता की, तेव्हापासून त्या नियमितपणे ब्लाउज व इतर कपडे त्यांच्याकडून शिवून घ्यायच्या.

1977 मध्ये नाशिकमध्ये 'दुनियादारी' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा या चित्रपटाची नायिका नूतनचे कपडे शिवण्याचे कामही भास्कररावांना मिळाले होते. अर्थात हे काम मिळण्यासही लतादीदी यांचा संदर्भ होताच.

दीदींचे भास्कररावांना पत्र

एकदा लतादीदी यांनी भास्कररावांना पत्र पाठविले होते. त्यामध्ये असे लिहिले होते की, मी औरंगाबादहून परस्पर इंदूरला आले आहे, तरी आपण इंदूरच्या पत्त्यावर कपडे पाठवून द्यावेत. मुंबईला जाताना नाशिकला अवश्य उतरेन, असा मजकूर आहे. भास्कररावांच्या कुटुंबीयांनी अजूनही हे पत्र जपून ठेवले आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT