पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस आजारांशी मुकाबला (Lalu Prasad Yadav's health) करणारे ऱाष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना त्यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) या किडनी देणार आहेत. एका वृत्तवाहिनीनुसार लालुप्रसाद यादव यांच्यावर लवकरच किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. रोहिणी यांच्या या किडणी दानाने लालुप्रसाद यांना नवं आयुष्य मिळणार आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव हे गेले काही दिवस किडनीच्या समस्येने (Lalu Prasad Yadav's health) त्रस्त आहेत. त्यामुळे लालुप्रसाद आणि राबडीदेवी यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांनी त्यांना किडनी देण्याचे ठरवले आहे. या निर्णयानंतर रोहिणी आचार्य हिने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, "या निर्णयाचा मला अभिमान वाटत आहे…"
राज्यसभा सदस्य आणि लालुप्रसाद यांची मुलगी मीसा भारतीने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, लालुप्रसाद यांची योग्य ती तपासणी करून किडनी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर एका वृत्तवाहिनीनुसार किडणी प्रत्यारोपणसाठी २०-२४ नोव्हेंबरच्या दरम्यान ते सिंगापूरला जातील. रोहिणी यांच्या किडनी देण्याच्या मताला सिंगापूरच्या डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. सिंगापूरमधील सेंटर फॉर किडनी डिसीज येथे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. सर्व तयारीही करण्यात आली आहे.
रोहिणी या सिंगापूरस्थित आहेत. त्यांच्या किडनी देण्याच्या मताला लालुप्रसाद हे तयार नव्हते. पण रोहिणी आणि कुटुंबिंयांच्या समजुतीनंतर ते शस्त्रक्रियेसाठी तयार झाले आहेत.
हेही वाचा