Latest

लालूप्रसाद यादवांसह कुटुंबीयांना दिलासा : CBI कोर्टाकडून जामीन मंजूर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राजदचे अध्‍यक्ष व माजी रेल्‍वे मंत्री  लालू प्रसाद यादव, त्‍यांच्‍या पत्‍नी राबडी देवी आणि कन्‍या मिसा भारती यांना 'नोकरीसाठी जमीन' प्रकरणात सीबीआय कोर्टातून आज ( दि. १५ ) जामीन मंजूर केला. न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचुकल्‍यावर जामीन मंजूर केला आहे. . सुनावणी दरम्यान लालू प्रसाद यादव व्हिलचेअरच्या सहाय्याने पत्नी राबडी देवी,मीसा सोबत हजर राहीले होते.

"नोकरीसाठी जमीन" प्रकरणात गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि इतर १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांना आज दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्‍यायालयाने लालूप्रसाद यादव कुटुंबियांना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.

लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) शनिवारी (दि.११) छापा टाकला होता. लालू प्रसाद यादव यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांविरोधीत नोकरी लावण्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता. जमिनीच्‍या बदल्‍यात नोकरीप्रकरणी लालू यादव यांच्यावर आणि कुटुंबीयांवर ही कारवाई करण्‍यात आली होती.

विशेष न्यायालयाने २७ फेब्रुवारीला लालू यांची पत्नी राबडी देवी, मीसा भारती यांच्यासह १४ इतर आरोपींना समन्स जारी करीत १५ मार्चला न्यायालयात हजर राहणचे आदेश दिले होते.रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन हडपल्याच्या आरोपाखाली सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव,राबडी देवी यांच्यासह इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

६ मार्चला सीबीआयने राबडी देवी यांची पटनातील निवासस्थानी ३ तास चौकशी केली होती.लालू प्रसाद यादव यांची देखील दिल्लीत चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणात १० मार्चला ईडीने यादव तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या घरी धाडी घातल्या होत्या. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव तिसऱ्यांदा सीबीआय समोर हजर राहीले नाही. यापूर्वी देखील त्यांनी सीबीआयच्या चौकशीत हजर राहणे टाळले होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT