Latest

Lalita Lajmi : प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांचे निधन, ‘तारे जमीन पर’मध्ये साकारली होती भूमिका

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचे सोमवारी (दि.१३) वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्या दिवंगत अभिनेते आणि चित्रपट निर्माते गुरु दत्त यांच्या बहीण होत्या. त्या चित्रकार होत्या तसेच त्यांनी आमिर खानच्या 'तारे जमीन पर'मध्ये भूमिका साकारली होती. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ललिता लाजमी यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1932 रोजी झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. 1994 मध्ये त्यांना नेहरू सेंटर, लंडन येथील भारतीय उच्चायुक्त गोपालकृष्ण गांधी यांनी आयोजित केलेल्या गुरू दत्त चित्रपट महोत्सवासाठी आमंत्रित केले होते. त्यांच्या कामावर भाऊ, सत्यजित रे आणि राज कपूर यांनी बनवलेल्या भारतीय चित्रपटांचाही प्रभाव होता. एका मुलाखतीत लाजमी म्हणाल्या की, मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असल्याने, शास्त्रीय नृत्याकडे जाणे त्यांच्या कुटुंबाला परवडणारे नव्हते. त्यांचे काका बी.बी. बेनेगल हे कोलकाता येथील व्यावसायिक कलाकार होते. त्यांनी त्यांना पेंट्सचा बॉक्स आणला होता. त्यामुळे त्यांच्यात चित्रकलेची आवड निर्माण झाली. 1960 ला मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत एका सामूहिक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला. 1961 मध्ये त्याच गॅलरीत त्यांचे पहिले स्वतंत्र प्रदर्शन भरले होते. त्यांचे पहिले पेंटिग जर्मन आर्ट कलेक्टर डॉ. हेन्झमोड यांनी 100 रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रदर्शने भरवली.

2007 ला त्यांना आमिर खानच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटात पाहुणे कलाकाराची भूमिका केली होती. अमोल पालेकर यांच्या नाटकासाठी कॉस्च्युम डिझायनिंग केले. तसेच आघात या हिंदी चित्रपटात ग्राफिक्स कलाकार म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT