केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा दौरा यशस्वी करा : चंद्रकांत पाटील

केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा दौरा यशस्वी करा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रविवारी (दि. 19) कोल्हापुरात येत आहेत. त्यांचा दौरा कार्यकर्त्यांनी यशस्वी करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत केले.

ना. पाटील म्हणाले, अमित शहा दौर्‍यात श्री अंबाबाई दर्शन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. पेटाळा येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी भाजपच्या नियोजित कार्यालय परिसरात गणेश मंदिर भूमिपूजन करून तेथेच भाजप पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी दहा हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. रात्री साडेआठच्या सुमारास हॉटेल पॅव्हेलियनमधील मधुसुदन हॉलमध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यावेळी शहा यांची सभा होणार असलेल्या जागेची पाहणी करून पोलिस प्रशासनास सूचना दिल्या. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, राहुल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील, अजित ठाणेकर, अशोक देसाई, हेमंत आराध्ये यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही

सध्या राज्यात सुरू असलेल्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या संपामुळे दहावी-बारावी व विद्यापीठ परीक्षांबाबत सरकार दक्ष आहे. या परीक्षांबाबत विद्यार्थी व पालकांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. संपकर्‍यांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यात येणार आहे. याबाबत एक बैठक झाली आहे. उद्या कॅबिनेटमध्ये चर्चा करून आणखी एक बैठक घेऊन प्रश्नांवर तोडगा काढला जाईल, असे मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news