नगर : विवाहितेसह माहेरच्यांना बेदम मारहाण ; फिर्याद दाखल | पुढारी

नगर : विवाहितेसह माहेरच्यांना बेदम मारहाण ; फिर्याद दाखल

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : सासरी घेऊन जाण्याच्या कारणावरून मनीषा नागरे या विवाहित तरुणीच्या माहेरच्यांना सासरच्या लोकांनी लाथा-बुक्क्यांसह दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी शहर हद्दीत घडली.  मनीषा एकनाथ नागरे (वय 20 वर्षे, रा. शेडगाव, ता. संगमनेर) या विवाहित तरुणीने राहुरी पोलिसात फिर्याद दिली. मनीषा नागरे व रोहित माणिक गर्जे (रा. राहुरी फॅक्टरी) यांचा 2022 मध्ये विवाह झाला. मनिषा नागरे हिचे शिक्षण सुरु असल्याने ती सासरी गेली नाही. या कारणावरुन मनिषा गागरे हिचा पती तिला त्रास देऊ लागला. यावेळी मनीषा गागरे हिने, ‘शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी सासरी येऊ शकत नाही,’ असे सांगितले.

यावर त्यांनी न्यायालयामार्फत मनीषा गागरे हिला नोटीस पाठविली. दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. मनीषा गागरे माहेरच्या लोकांबरोबर दुचाकीवरून (शेडगाव, ता. संगमनेर)कडे जात होती. ग्रीन हॉटेल चौक, ताहाराबाद रोड, राहुरी येथे ते उभे राहिले असता रोहित गर्जे तेथे येत म्हणाला, ‘माझ्या सोबत गाडीवर घरी चल.’ यावर मनीषा गागरे हिने नकार दिला. यावर रोहित गर्जे याने मनीषा गागरेसह तिच्या माहेरच्या लोकांना लाथा- बुक्क्यांसह दांड्याने मारहाण केली. शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

मनीषा गागरे हिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात रोहित माणिक गर्जे, आशाबाई माणिक गर्जे, माणिक रामकिसन गर्जे, विठ्ठल माणिक गर्जे, (चौघे रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी), भानुदास बाबुराव आघाव (रा. वाघाचा आखाडा व लता दिनकर सानप ( रा. चिंचाळे, ता. राहुरी) या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पो. नि. मेघशाम डांगे करीत आहेत.

Back to top button