Latest

Lalit Modi : ललित मोदींनी ९ वर्षांनी मोठ्या असलेल्या आईच्या मैत्रीणीसोबत केले होते लग्न

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचे माजी अध्यक्ष व भारतातून परागंदा झालेले ललित मोदी (Lalit Modi) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताची माजी मिसयुनिव्हर्स तथा अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्या सोबत ललित मोदी यांनी लग्न केल्याची चर्चा सुरु आहे. सध्या ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचे मालदिव येथील एकत्र सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो वायरल झाले आहेत. त्यामुळे दोघांनी लग्न केल्याच्या बातम्यांचा सध्या धडका सुरु आहे. यामुळे पुन्हा एकदा ललीत मोदी चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या ४६ वर्षांची आहे, तसेच ती अद्याप अविवाहित आहे. पण, तिचे या आधी तब्बल ११ जणांसोबत अफेअर होते. शिवाय यातील तीन – चार जणांसोबत लग्न करण्यापर्यंतच्या निर्णया पर्यंत ती पोहचली होती. पण अखेर ते घडू शकले नाही. तिचा एक बॉयफ्रेंड तर तिच्याहून १५ वर्षांनी लहान होता. सध्या तिचे नाव ललित मोदी (Lalit Modi) यांच्याशी जोडले गेले आहे. शिवाय येणाऱ्या बातम्या पाहिल्यात तर त्या दोघांनी लग्न केले आहे असे म्हटले जात आहे. सुष्मिता सेनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले ललित मोदी हे सुद्धा सुष्मिता सेन पेक्षा कमी नाहीत. त्यांनी तर त्यांच्या आईच्या मैत्रिणीशी आपल्या पेक्षा ९ वर्षांनी मोठ्या असेलेल्या मीनल (Meenal Modi) यांच्याशी विवाह केला होता.

ललित मोदींनी केले आईच्या मैत्रीणीशी विवाह (Lalit Modi)

ललित मोदी यांनी आपल्या आईच्या मैत्रीणीशीच विवाह केला. या गोष्टीला त्यांच्या घरातून विरोध होता पण, त्यांनी या विरोधाला जुमानले नाही. अखेर आपल्यापेक्षा ९ वर्षांनी मोठ्या असलेल्या मीनल यांच्याशी त्यांनी विवाह थाटला.

नायझेरियातील उद्योगपतीशी मीनल यांचा झाला होता विवाह (Lalit Modi)

ललित मोदी यांनी आपल्या प्रेमाच्या भावना मीनल यांच्या समोर व्यक्त केल्या. तेव्हा पहिल्यांदा मीनल या नाराज झाल्या. यानंतर त्यांनी ललित मोदी यांना गाभीर्यांने घेतले नाही. काही दिवसांनी मीनल यांनी नायझेरिया येथील उद्योगपतीशी विवाह केला. या विवाह नंतर ललित मोदी आणि मीनल यांच्यातील बोलणेच बंद झाले.

मीनल आणि ललित मोदी यांचे लग्न

मीनल यांचे नायझेरिया येथील उद्योगपतीशी झालेले लग्न फार काळ टिकले नाही. या दोघांना एक मुलगी देखिल झाली होती पण, काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर पुन्हा एकदा ललित मोदी आणि मीनल हे जवळ आले. पण, या दोघांची जवळीक ललित यांच्या कुटुंबाला फारशी पसंद नव्हती. आपल्या नाराज कुटुबियांना आपल्याकडून वळविण्याचे मोदी यांनी पयत्न चालू केला. अखेर त्यांच्या आजी दयावती मोदी यांनी दोघांच्या संबधाला होकार दिला. ललित मोदी यांनी १७ ऑक्टोंबर १९९१ रोजी मीनल यांच्याशी विवाह केला.

सावत्र मुलीला सांभाळले

ललित मोदी यांनी सावत्र मुलीला आपल्या कुटुंबात स्थान दिले. तिला बापाचे प्रेम दिले. तिचे नाव करीम सगलानी असे आहे. शिवाय ललित आणि मीनल यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव रुचिर आणि मुलीचे नाव आलिया असे आहे.

मीनल यांचा मृत्यू

मीनल मोदी यांचा २०१८ साली मृत्यू झाला. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यू नंतर एक भावनिक पोस्ट लिहून माहिती दिली होती. पण, त्यांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे सांगितले नव्हते.

ललित मोदी यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

ललित मोदी यांनी २००८ साली भारतात आयपीएलची सुरुवात केली होती. आयपीएलमध्ये घोटाळा करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या घोटाळ्यानंतर त्यांनी भारतातून पळ काढून इंग्लंड गाठले. भारत सरकार अद्याप ललित मोदी यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण, अद्याप त्यांना यात यश मिळाले नाही. ललित मोदींवर मनी लॉड्रिंगचे आरोप लावण्यात आले आहेत. २०१० मध्ये आयपीएलमध्ये २ नव्या संघांचा समावेश करण्यात आला होता. ललित मोदींवर आरोप ठेवण्यात आले आहेत की या २ संघांच्या लिलावासाठी त्यांनी चुकीच्या मार्गांचा वापर केला. तसेच त्यांनी मॉरिशयसच्या एका कंपनीला आयपीएलचा ४२५ कोटींचा ठेका दिला होता. यामध्ये त्यांनी १२५ कोटी कमिशन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

SCROLL FOR NEXT