Latest

Lab-grown blood : प्रयोगशाळेमध्ये निर्मित रक्‍ताची मानवावर चाचणी सुरु : ब्रिटनमध्ये जगातील पहिली क्लिनिकल ट्रायल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रयाोगशाळेत निर्मिती केलेल्‍या रक्‍ताची मानवावर ट्रायल घेण्‍याच्‍या प्रयाोगास ब्रिटनमध्ये सुरुवात झाली आहे. हा प्रयोग यशस्‍वी झाल्‍यास जगभरातील रक्‍ताचा तुटवडाही कमी होण्‍यास मदत होणार आहे. ( Lab-grown blood ) तसेच दुर्मिळरक्‍तगट असलेल्‍या रुग्‍णांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे वृत्त 'बीबीसी'ने दिले आहे.

Lab-grown blood :  जगातील पहिली क्लिनिकल ट्रायल

ब्रिटनमध्ये प्रयोगशाळेत निर्मित रक्‍तावर परीक्षण सुरु आहे. प्रयोगशाळेत निर्मित रक्‍त प्रथमच मानवावर प्रयोग करण्‍यात आला आहे. संशाोधनात सहभागी झालेल्‍या स्वंयसेवकांना एक ते दोन चमचे रक्‍त दिले जात आहे. ते शरीरात कसे प्रवाहित होते, यावर क्लिनिकल ट्रायल घेण्‍यात येत आहे.

अतिदुर्मिळ रक्‍तगट असलेल्‍या रुग्‍णांना मिळणार दिलासा

या प्रयोगासंदर्भात माहिती देताना ब्रिस्टल विद्यापीठातील प्रोफेसर ऍशले टॅाय यांनी सांगितले की, ब्रिटनमधील ब्रिस्टल, केंब्रिज, लंडन विद्यापीठ आणि 'एनएचएस' संस्‍था या प्रयोगशाळेतील रक्त निर्मितीवर संयुक्‍त संशाोधन करत आहे. अतिदुर्मिळ रक्‍तगट असलेल्‍या रुग्‍णांना रक्‍ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणावतो. अशा रुग्‍णांसाठी रक्‍त तयार करणे हा या प्रयोगाचा मुख्य हेतू आहे, असेही टॅाय यांनी स्‍पष्‍ट केले.

या प्रयोगात दोन स्‍वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. किमान १० निरोगी स्‍वयंसेवकाना चाचणी घेण्‍याचे उद्देश आहे. त्‍यांना चार महिन्‍यांच्‍या अंतराने दोनदा ५ ते १० एलएल रक्‍त दिले जाणार आहे. या प्रयोगात एक डोस हा नैसर्गिक रक्‍ताचा असेल तर दुसरा डोस प्रयाोगशाळेत तयार केलेल्‍या रक्‍ताचा असेही त्‍यांनी सांगितले.
'

एनएचएस'चे मुख्‍य संचालक डॅा. फारुख शाह यांनी म्‍हटले आहे की, " सिकलसेल विकार असलेल्‍या लोकांना सुरक्षितपणे रक्‍त देण्‍यासाठी वापरल्‍या जाणार्‍या लाल रक्‍तपेशींच्‍या निर्मितीबाबत हे जगातील पहिलं महत्त्वाचे संशाोधन आहे.

लाल रक्‍तपेशी बदलण्‍यायाोगय होण्‍यापूर्वी सुमारे १२० दिवस टिकतात. रक्‍तदान केलेल्‍या रक्‍तामध्‍ये नव्‍या आणि जुन्‍या लाल रक्‍तपेशीचेमिश्रण असते. तर प्रयाोगशाळेत तयार केलेल्‍या रक्‍तामध्‍ये सर्व नव्‍या रक्‍तपेक्षी असतात. त्‍यामुळे त्‍या १२० दिवस टिकतील, अशी अपेक्षा शास्‍त्रज्ञांनी व्‍यक्‍त केली आहे. मात्र यासाठीचा खर्च हा प्रचंड मोठा आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT