Skin Health : त्वचेचं आरोग्य जपणं हे निरोगीपणासाठी आवश्यक, अशी घ्या काळजी | पुढारी

Skin Health : त्वचेचं आरोग्य जपणं हे निरोगीपणासाठी आवश्यक, अशी घ्या काळजी

Skin Health : निसर्गातील प्रत्येक प्राण्याला त्वचेच्या रुपानं एक कवच लाभलं आहे. या त्वचेमुळे बाहेरील जीवजंतू, अतिनील प्रकाशकिरणे यांपासून संरक्षण होत असते. त्याचबरोबर त्वचेमुळे स्पर्शज्ञानही होते. त्वचेमध्ये असणार्‍या विविध घटकांमुळे शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचं आरोग्य जपणं हे निरोगीपणासाठी आवश्यक असतं.

निसर्गातील प्रत्येक प्राण्याला त्वचेच्या रुपानं एक कवच लाभलं आहे. या त्वचेमुळे बाहेरील जीवजंतू, अतिनील प्रकाशकिरणे यांपासून संरक्षण होत असते. त्याचबरोबर त्वचेमुळे स्पर्शज्ञानही होते. त्वचेमध्ये असणार्‍या विविध घटकांमुळे शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचं आरोग्य जपणं हे निरोगीपणासाठी आवश्यक असतं.

Skin Health : त्वचेचे आरोग्य बाह्य स्वच्छतेबरोबरच शरीरातील तंदुरुस्तीवरही अवलंबून असते. शरीरात दोष निमार्र्ण झाल्यास ते त्वचेमार्फत जंतूना आत प्रवेश देण्यास अनुकूल वातावरण तयार करते. म्हणूनच बाहेरून काळजी घेण्याबरोबरच आतूनही घ्यावी. त्वचा हे निसर्गाने मानवाला दिलेले जणू कवच आहे. संपूर्ण शरीरावर असणारी त्वचा शरीराचे संरक्षण करत असते. शरीरात प्रवेश करण्यासाठी प्रवेश करण्याचा जीवजंतूंना रोखण्याचे महत्त्वाचे काम त्वचा करत असते. सर्वसाधारणपणे त्वचेचे दोन स्तर असतात. बाहेरचा स्तर ज्यामध्ये रंगद्रव्य, धर्मरंध्र आणि केशरंध्र असतात. रंगद्रव्यामुळे त्वचेचे उन्हापासून संरक्षण होते. एखाद्या भौगोलिक परिस्थितीनुसारही त्वचेचा रंग ठरत असतो. म्हणजे जेथे खूप अधिक ऊन असते तेथे त्वचेचा रंग गडद दिसून येतो. सतत उन्हात काम करणार्‍या व्यक्तींची त्वचा रापते, काळवंडते तर दुसरीकडे ज्यांचा उन्हाशी संपर्क येत नाही त्याचा वर्ण गौर राहतो.

Skin Health : त्वचेतील रंग द्रव्यांमळे शरीराचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते. ज्या व्यक्तींमध्ये रंगद्रव्याचा हा स्तर कमी असतो किंवा नसतोच त्यांना उन्हाचा त्रास अधिक होतो. त्वचेचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे तापमान नियंत्रित ठेवणे. त्वचेवर धर्मरंध्रे असतात. त्यातून घामाचा स्राव होतो. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. घामामुळे त्वचेत ओलावा राहतो त्यामुळे त्वचा फाटत नाही. याउलट हिवाळ्यात घात येत नाही. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो आणि त्वचा फाटते.

उन्हाळ्यात उन्हामध्ये फिरताना जास्त घाम येतो. अशा वेळी त्वचा शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असते. हे काम योग्य पद्धतीने न झाल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच उन्हात जाताना पुरेशी काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. स्पर्श अथवा संवेदना जाणणे अर्थात त्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे कामही त्वचा करत असते. स्पर्श संवेदना ही खूप महत्त्वाची देणखी निसर्गाने मानवाला दिली आहे. चांगली वाईट, सुखाची दुःखाची संवेदना आपल्याला त्वचेमार्फत समजत असते. म्हणून त्वचेच्या या ज्ञानाकडे आपण अधिक लक्ष पुरवले तर आपल्या संवेदना अधिक बळकट करता येतात. अंध व्यक्तींची स्पर्श संवेदना अधिक बळकट असते म्हणूनच त्या व्यक्ती स्पर्शाच्या सहाय्यानेच सर्व कामे करू शकतात.

Skin Health : त्वचेचा आतला स्तर हा बाह्य त्वचेचे पोषण करत असतो. तसेच केशमुळे, धर्मरंध्रे याच स्तरात असतात. बाह्य त्वचेच्या पेशी ठराविक काळानंतर तेथे जंतूंची वाढ अधिक होते. यामुळे पुरळ येणे, खाजणे, कोंडा होणे, केस गळणे, यांसारखे त्रास दिसू लागतात. म्हणून या सर्व गोष्टींपासून दूर राहण्यासाठी डोके आणि त्यावरचे केस नेहमीच स्वच्छ ठेवावे. ते धुण्यासाठी सौम्य साबण वापरावा. शक्यतो शिकेकाई, रिठा, संत्र्याचे साल याने केस धुणे केव्हाही उत्तम ठरते. डोक्यात पुरळ आल्यास आवळा पावडर वापरावी. केसांना तेल लावण्याऐवजी मुळाशी त्वचेला तेल लावावे. अधिक केस असलेल्या त्वचेची अशी काळजी घ्यावी.

कमी केस असलेली त्वचा म्हणजे शरीराची उर्वरित त्वचा म्हणजे हात, पाय, पोट, पाठ, इ. यावर तुलनात्मक केसांचे प्रमाण कमी असते. या त्वचेवरून व्यक्तीचा वर्ण ठरत असतो. त्यातही हाताच्या आतल्या भागाची त्वचा अधिक पातळ आणि उजळ असते; तर बाहेरच्या भागाची त्वचा थोडी जाड आणि गडद रंगाची असते. या त्वचेला नियमित अभ्यंग केले, तिची स्वच्छता राखली तर ती चांगली राहू शकते. अजिबात केस नसलेली त्वचा म्हणजे ओठ, तळहात, तळपाय ही त्वचा होय. तळहात तळपायाची त्वचा तुलनेने जाड आणि रंगद्रव्य नसलेली असते. यावर पेशी मृत होत असतात. नव्या पेशी निर्माण करण्याचे काम त्वचेचा आतला स्तर करतो. जखम झाल्यास ती भरून आणण्याचे काम हाच स्तर करत असतो. तसेच बरेचशे बाह्य आघात सहन करण्याचे कामही हा स्तर करत असतो. त्वचेची इतकी सारी कामे आणि महत्त्व ओळखून त्वचेच्या प्रकारानुसार योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे.

Skin Health : शरीरांच्या ज्या भागात जास्त केस असतात. उदा. डोके, काखा पुरुषांमध्ये गाल, ओठांवर अशा ठिकाणी जास्त केस असणारी त्वचा असते. या ठिकाणी केस जास्त म्हणून संवेदना जास्त आणि धर्मरंध्रंही जास्त असतात. त्यामुळे येथे घाम जास्त येतो. म्हणून अशा ठिकाणी तीव्र रसायनांचा वापर टाळावा. भरपूर पाणी वापरवावे. सौम्य साबण वापरावा. केसांखालची त्वचा स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. या त्वचेला सूर्यप्रकाश फारसा मिळत नसल्याने जंतूंचा प्रादुर्भाव येथे जास्त होण्याची शक्यता असते. उदा. डोक्याच्या त्वचेला जास्त जपावे. उन्हामुळे तेथे घामही खूप येत असतो. हातांवरच्या रेषांकडे आपण भविष्य रेषा म्हणून बघत असलो तरी त्यांचा शास्त्रीय उपयोग वस्तू पकडण्यासाठी होतो. तसेच यामुळे स्पर्शज्ञान सोपे होते.

हातांमुळे जमिीवर, भिंतीवर पकड घेता येते यात रेषांचा वाटा मोठा असतो. या रेषांमध्ये जंतूही मोठ्या प्रमाणात राहतात. म्हणून हातांची स्वच्छता फार महत्त्वाची असते. हा जंतूसंसर्ग, कान, नाक, तोंड, डोळे अशा सर्व ठिकाणी पोहोचू शकतो. ओठांची त्वचा केसरहित असली तरी तिच्यात रंगद्रव्य असतात. ही त्वचा पातळ असते. थंडीत ती फुटते त्यावेळी त्यावर क्रिम, साय, तूप असे स्निग्ध पदार्थ लावतात. त्वचेचे आरोग्य बाह्य स्वच्छतेबरोबरच शरीरातील तंदुरुस्तीवरही अवलंबून असते. शरीरात दोष निमार्र्ण झाल्यास ते त्वचेमार्फत जंतूंना आत प्रवेश देण्यास अनुकूल वातावरण तयार करते. म्हणूनच बाहेरून काळजी घेण्याबरोबरच आतूनही घ्यावी.

  • डॉ. संतोष काळे

हे ही वाचा :

Health : स्नायूंच्या आरोग्याची चिंता वाटतेय? समतोल आहाराचे सेवन करत उतारवयातही तंदुरुस्त रहा

Back to top button