Latest

Kolhapur News : सदर बाजार येथे वर्चस्ववादातून एकावर खुनी हल्ला; प्रकृती चिंताजनक

अविनाश सुतार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा :  सदरबाजार येथील एका प्रार्थना स्थळातील वर्चस्ववादातून झालेल्या खुनी हल्ल्यात महंमदखान तोताखान पठाण (वय 52) गंभीर जखमी झाले. आज (दि.१३) दुपारी सदर बाजार येथील भर चौकात ही घटना घडली. तीन ते चार हल्लेखोरांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात पठाण गंभीर जखमी झाले आहेत.  त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान,  अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Kolhapur News

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात पठाण यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वाताववरण निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालय आणि सदर बाजार परिसरात तैनात करण्यात आला होता. Kolhapur News

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT