कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोची धडक, एक ठार | पुढारी

कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोची धडक, एक ठार

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बिरदेव मंदिरासमोर ऊसाने भरून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत टेम्पोचा चालक ठार झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले. मयत व जखमी हे सांगली जिल्ह्यातील असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (दि. ८) रात्री १० वाजताच्या सुमारास झाला.

बंगळूरुहून पुणेच्या दिशेने ऊस भरून निघालेला ट्रॅक्टर ( क्र.एम. एच. ४४ एस ३३३१) व ट्रॉलीला ( क्र.एम एच ४४ एस ४४६३ व ४४६४) पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये टेम्पोचालक ( क्र. एम. एच . ०९ सी ए ८१३४ )भाऊसो नाना लोंढे (वय ४३ रा.भडकंबे ता.वाळवा) हे ठार झाले , तर शुभम महादेव पोळ व ओंकार सर्जेराव माने दोघेही रा. नागाव ता. वाळवा जि. सांगली हे जखमी झाले . या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे

Back to top button