पुढारी ऑनलाईन डेस्क : आठ दिवसांपासून संततधार (Kolhapur Rain Update) सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत आहे. आज (दि. १५) सकाळी २ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.१० फुटांवर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे) पोहोचली. जिल्ह्यातील एकुण ६४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
Kolhapur Rain Update : भोगावती नदी पाणी पातळीत वाढ
भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजूबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी सायंकाळी राजाराम बंधार्यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत असल्याने खबरदारी म्हणून प्रयाग चिखली व आंबेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी पहाटेपासूनच बाडबिस्तारा आवरायला सुरुवात केली. दिवसभरात सुमारे 40 ते 50 टक्के ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून प्रयाग चिखलीच्या बहुतांश ग्रामस्थांनी पुनर्वसन झालेल्या सोनतळी ठिकाणी आसरा घेतला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत चिखलीतील सुमारे अडीच ते तीन हजार तर आंबेवाडीतील 800 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये आले असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हेलिपॅडसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, स्थानिक रेस्क्यू फोर्ससह संबंधितांना सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील बंधाऱ्याची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम 37.7 फूट, सुर्वे 36 फूट, रुई 66 फूट, इचलकरंजी 61.6 फूट, तेरवाड 55.8 फूट, शिरोळ 49.3 फूट, नृसिंहवाडी 48.6 फूट, राजापूर 37.2 फूट तर नजीकच्या सांगली 19.6 फूट व अंकली 24.11 फूट आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा दलघमीमध्ये
राधानगरी 151.43 , तुळशी 61.75, वारणा 639.13, दूधगंगा 391.22, कासारी 57.18, कडवी 49.60, कुंभी 47.91, पाटगाव 65.05, चिकोत्रा 28, चित्री 33.99, जंगमहट्टी 25.07, घटप्रभा 44.17, आंबेआहोळ 30.08
जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी धरणात 151.43 दलघमी पाणीसाठा असून धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू.
जिल्ह्यातील 64 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील– शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,
भोगावती नदीवरील– हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव व तारळे,
कासारी नदीवरील– वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव,
कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे,
वेदगंगा नदीवरील– कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली
तुळशी नदीवरील– बीड व आरे, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी चंदगड व हल्लारवाडी,
धामणी नदीवरील– सुळे, पणुंद्रे व आंबर्डे,
घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, हिंडगांव, तारेवाडी, अडकूर, बिजूरभोगोली व पिळणी,
वारणा नदीवरील– चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे व दानोळी,
दुधगंगा नदीवरील– दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली,
हिरण्यकेशी नदीवरील– निलजी, गिजवणे, ऐनापूर, साळगांव व चांदेवाडी असे 64 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपत्कालीन परिस्थिती- कोल्हापूर जिल्हा प्रशासना नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
०२३१-२६५९२३२
०२३१-२६५२९५०
०२३१-२६५२९५३
०२३१-२६५२९५४
टोल फ्री क्र. १०७७
जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष
टोल फ्री क्रमांक- १०७७ दू. क्र- २६५९२३२/ २६५२९५०/२६५२९५३/२६५२९५४
जिल्हा परिषद आरोग्य : २६६१६५३
पोलिस विभाग : २६६२३३३/११२
राष्ट्रीय महामार्ग : २६५२९६०
सार्वजनिक बांधकाम : २६५१४५७
(वरील माहिती सकाळी २ वाजेपर्यंतची आहे)
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.