Latest

कोल्‍हापूर : हुपरीत कारसह लाखोची रोकड लंपास; २४ तासांत दोन आरोपींना बेड्या

निलेश पोतदार

हुपरी; पुढारी वृत्तसेवा रेंदाळ हुपरी येथील एका हॉटेलजवळ लावलेली इंडिगो कार रोकडसह पळवून नेण्यात आली होती. या प्रकरणाचा 24 तासांत तपास लावण्यात हुपरी पोलिसांना यश आले. 12 लाख 7 हजार रूपयांच्या रोकडसह सैफुल्ला निसार दुधगावे, विनायक भगवान पाटील दोघे रा. रेंदाळ यांना जेरबंद करुन कार जप्त करण्यात आली. पेठ नाका कराड येथे हुपरी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, सपोनि पंकज गिरी यांनी सांगितले.

फिर्यादी राजेश नरसिंग पांडव, व्यवसाय शेती, रा. आळते, ता. हातकणंगले हे पुणे येथे जमीन खरेदी करण्यासाठी जात होते. त्यांच्या इंडीगो कार नं. MH-14 BC-2987 मध्ये 26 लाख 10 हजार रुपयांची रोकड होती. त्यांचा ड्रायव्हर सैफुल्ला निसार दुधगावे, विनायक भगवान पाटील, रा. रेंदाळ हे सर्वजण कारमध्ये होते. हुपरी रेंदाळ जवळील एका हॉटेलमध्ये पाण्याची बाटली आणण्यासाठी पांडव हे उतरले. त्यावेळी मागे बसलेल्या सैफुल्ला निसार दुधगावे, विनायक भगवान पाटील या दोघांनी गाडी पळवून नेली होती.

याचा तातडीने तपास लावण्यात हुपरी पोलिसांना यश आले असून, सपोनि पंकज गिरी, उपनिरीक्षक गणेश खराडे, पो ना ए. पी. पोटकुले, पो ना कांबळे, पो कॉ जमादार यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. एका महिन्यात चोरीचे दोन मोठे  गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी हुपरी पोलिसांचे कौतुक केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT