Latest

Kolhapur : चित्री मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; आजरा, गडहिंग्लज तालुकावासियांकडून समाधान

सोनाली जाधव

सोहाळे : सचिन कळेकर : आजरा, गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरुन विसर्ग सुरु झाला आहे. तर विद्युत निर्मितीसाठी १८० क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद बाहेर पडत आहे. चित्री मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असल्याने आजरा, गडहिंग्लज तालुकावासियांकडून समाधान व्यक्त होत आहे. (Kolhapur )

Kolhapur : आजरा, गडहिंग्लज तालुकावासियांकडून समाधान 

प्रतीवर्षी चित्री मध्यम प्रकल्प जुलैअखेर ते ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तुडूंब होतो. गेल्या १० वर्षाच्या कालावधीत सन २०१५ ला पावसाने दडी मारल्याने त्यावर्षी प्रकल्पात फक्त ८५ टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र इतर वर्षामध्ये पाऊस चांगला झाल्याने प्रकल्पात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. प्रतिवर्षी चित्री धरण परिसरात ३५०० मि.मी. पर्यंत पाऊस पडतो. साधारणतः २ हजार मि. मी. पाऊस होताच चित्री प्रकल्प भरतो.

दि. १ जूनपासून आजअखेर १९२४ मि.मी. पाऊस झाला आहे. इतर ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात असला तरी चित्री प्रकल्प परिसरात पाऊस सुरुच असल्याने शनिवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता चित्री मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला. चित्री प्रकल्पातून विद्युत निर्मितीसाठी १८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून तासाला दीड मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे.

पर्यटकांची  गर्दी

चित्री प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे ५८५० हेक्टर किमान क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ६० गावांतील लोकांना या पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे गडहिंग्लज उपविभागातील लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे. चित्री मध्यम प्रकल्प भरला असल्याने आजरा, गडहिंग्लजसह इतर भागातून पर्यटक पाणीसाठा पाहण्यासाठी प्रकल्पावर गर्दी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT