Latest

Kiara-Sidharth Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या विवाहासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी जैसलमेरमध्ये दाखल (Video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मनोत्रा राजस्थानच्या जैसलमेरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. कटरीना आणि विकी कौशलप्रमाणेच कियारा आणि सिद्धार्थने आपल्या विवाहाबाबत कमालीची गोपनीयता ठेवली आहे. मात्र, सोशल मीडीयावर विवाहापूर्वीच्या विधींचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, कियारा-सिद्धार्थच्या विवाहासाठी अनेक बॉलिवुड सेलीब्रिटी विवाहस्थळी दाखल झाले आहेत. (Kiara-Sidharth Wedding)

कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाह राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पार पडणार आहे.  बॉलिवुड सेलीब्रिटी त्यांच्या विवाहासाठी रवाना होताना दिसत आहेत. काहींनी विवाहस्थळ देखील गाठले आहे. प्रोड्युसर करण जोहर हे सिद्धार्थ-कियाराच्या विवाहासाठी जैसलमेर येथे दाखल झाले आहेत. विवाहस्थळी दाखल झालेला त्‍यांचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. करण जोहर शिवाय शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर देखील विवाहाला उपस्थिती लावण्यासाठी राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. करण जोहर, शाहिद कपूर आणि मीरा कपूर हे सिद्धर्थ-कियाराचे खास पाहुणे मानले जात आहेत. (Kiara-Sidharth Wedding)

'या' दिवशी होणार सिद्धार्थ-कियाराचा विवाह

कियारा-सिद्धार्थच्या विवाह ६ फेब्रुवारीला पार पडेल, असे बोलले जात होते. मात्र, त्यांचा विवाह ६ फेब्रुवारीला नाही तर ७ फेब्रुवारीला पार पडणार आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मनोत्रा यांचा विवाह जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडेल. सूत्रांच्या माहितीनुसार कियारा अडवाणी विवाहप्रसंगी मनीष मल्‍होत्राने डिजाईन केलेला ड्रेस परिधान करेल. (Kiara-Sidharth Wedding)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT