Latest

KGF-3 : केजीएफच्या चाहत्यांना मोठी खुशखबर! २०२५ ला रॉकीभाईचा पुढचा भाग?

backup backup

पुढारी, ऑनलाईन डेस्क : केजीएफ-२ (KGF-2) हा २०२२ मधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. तरुणांनी अक्षरश: या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. केजीएफच्या दोन्ही भागांच्या यशस्वी प्रयोगानंतर चित्रपटाच्या चाहत्यांना केजीएफ-३ (KGF-3) कधी येणार याचा प्रश्न पडला होता. याचसंदर्भात आता चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे.

केजीएफच्या 'रॉकी भाईचा' म्हणजेच सुपरस्टार यशचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त केजीएफ निर्मित होमाबेल फिल्मस कंपनीने (Hombale Films) त्याला शुभेच्छा देत केजीएफ-३ (KGF-3)चित्रपट बनवणार असल्याचे सुचक विधान केले आहे. हा चित्रपट २०२५ ला येईल असा अंदाज देखील वर्तविला जात आहे.  मात्र या चित्रपटात सुपरस्टार यश असेल की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

सुपरस्टार यशच्या वाढदिवसादिवशी मोठी खुशखबर

केजीएफच्या अभिनेता यशचे देशभरात भरपूर चाहते आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोन दिवसांपूर्वीच यशने वाढदिवसादिवशी कोणत्याही नव्या चित्रपटाबाबतची घोषणा करणार नाही, असे सांगितले होते. विशेषत: केजीएफ-२ बाबत कोणतीही माहिती देणार नाही असाच त्याचा अर्थ होता. यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटलेले होते. मात्र होमाबेल फिल्म कंपनीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. याबाबतच्या ट्विटमध्ये या फिल्म कंपनीने केजीएफ-३ बनवणार असल्याची पूर्व सूचना दिली आहे. त्यामुळे आता चाहत्यांसाठी यशच्या वाढदिवसाला मोठी खूशखबर मिळाली आहे.

काय आहे या ट्विटमध्ये?

केजीएफ-२ ला भरभरुन यश मिळाले, हा खूप मोठा प्रयोग होता. आता आगामी प्रयागोची प्रतिक्षा लागून राहिली आहे. आपल्या स्वप्नाला आकार देणार्‍या आणि स्वप्नांच्या पलीकडे नेणार्‍या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! येणारे वर्ष उज्ज्वल यशाचे आणि भरभराटीचे जावो. अशा आशयाचे हे ट्विट होमोबेल फिल्म (Hombale Films) कंपनीने केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT