Latest

Keegan Petersen’s catch : चर्चा किगन पीटरसनच्या अफलातून कॅचची

अमृता चौगुले

केप टाऊन; पुढारी ऑनलाईन : भारत व दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी खराब झाली. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मार्कोयान्सन याच्या गोलंदाजीवर लेग गलीमध्ये किगन पीटरसन ( Keegan Petersen's catch ) याने अफलातून झेल घेत पुजाराला बाद केले. पीटरसनने यावेळी हवेत झेप घेत सुपरमॅनप्रमाणे हा अप्रतिम कॅच पकडला. ९ धावांवरच पुजाराला माघारी परतला. या कॅचमुळे पीटरसनची सर्वत्र चर्चा होत आहे.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि चेतश्वर पुजारा मैदानात उतरले. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी डीन एल्गर याने युवा गोलंदाज मार्को यान्सन याला दिली. यान्सचा हा दुसरा चेंडूत होता. पुजारासाठी एल्गर याने लेग साईडला फिल्ड जमवली होती. यान्सने लेग स्टम्पवर शॉर्ट बॉल फेकला. चेंडूने चांगलीच उसळी घेतली. वेगाने चेंडूने उसळी घेतल्याने पुजारा  भांबावला. त्याने चेंडूला नियंत्रणात आणण्यासाठी ऑफसाईटकडे जाऊन चेंडूला डिफेन्ड करण्याचा प्रतत्न केला. पण, यासगळ्या प्रयत्नात जे व्हायला नको होते तेच झाले. बॅटचा कडा स्पर्श करुन चेंडू लेग गलीला गेला. ( Keegan Petersen's catch )

लेगसाईडला किगन पीटरसन क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. चेंडू अत्यंत वेगात लेग गलीकडे गेला. क्षणाचाही विलंब न करता आपल्यापासून दूर असलेल्या चेंडूला पकडण्यासाठी पीटरसनयाने चेंडूच्या दिशेने हवेत सूर मारला, काही क्षण हवेतच समांतर राहून त्याने अफलातून कॅच पकडला( Keegan Petersen's catch ). या अप्रतिम कॅचमुळे पुजाराला तंबूत परतावे  लागले.

पुढील षटकात रबाडा याने पुजारा नंतर मैदानात उतरलेल्या अजिंक्य रहाणे याला बाद केले. रहाणे हा स्लीपकडे कॅच देऊन बाद झाला. त्याला केवळ १ धाव करता आली. डावाच्या सुरुवातीलाच भारताने महत्त्वाचे व अनुभवी दोन फलंदाज गमावले यामुळे भारतीय संघावर मोठे दडपण आले.

पुजारा आणि रहाणेची शेवटची खेळी ?

पुजारा पाठोपाठ रहाणे देखील दुसर्‍याच षटकात बाद झाला. अनेकांनी दोघांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन या दोघांना संघातून वगळून नव्या खेळाडूंना संधी देण्याची मागणी हाेत आहे. गेली अनेक दिवस चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे कदाचीत ही पुजारा आणि रहाणेची शेवटची खेळी ठरु शकते, असे देखील मानले जात आहे. हनुमा विहारी, श्रेयश अय्यर, शुभमन गील या सारख्या खेळाडूंना संधी मिळेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT