Latest

Kedar Jadhav in IPL : केदार जाधवचे आयपीएलमध्ये कमबॅक! कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर उडी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kedar Jadhav in IPL : मराठमोळ्या केदार जाधवने (Kedar Jadhav) कॉमेंट्री करता करताच थेट आयपीएलच्या मैदानावर उडी घेतली आहे. आता तो आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. सोमवारी फ्रँचायझीने एक नवी घोषणा करत संघात बदल केल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी डेविड विलीच्या जागी अष्टपैलू केदारला संघात स्थान दिल्याचे स्पष्ट केले.

केदार जाधवला (Kedar Jadhav) आयपीएलच्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्याचा फॉर्मही चांगला नव्हता. त्यामुळे जेव्हा लिलाव झाला तेव्हा त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे आता केदार यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही, असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले होते. अशातच केदारने आपला मोर्चा आयपीएलच्या मराठी कॉमेंट्रीकडे वळवला होता. अचानकपणे या मराठमोळ्या क्रिकेटरचे नशिब बदले आणि त्याला आरसीबीने आपल्या संघाकडून खेळण्याची संधी दिली आहे. (Kedar Jadhav in IPL)

आरसीबीने (RCB) याबाबत ट्विट करून याची माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी डेव्हिड विलीच्या जागी आम्ही केदार जाधवला आरसीबीच्या संघात स्थान देत आहोत, असे म्हटले आहे. त्यामुळे आता केदार जाधव हा आरसीबीच्या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

विलीने यंदाच्या हंगामात (IPL 2023) आरसीबीसाठी (Royal Challengers Bangalore) 4 सामने खेळले. काही दिवसांपूर्वी तो दुखापतग्रस्त झाला होता. त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची होती. आता तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विलीच्या जागी केदार जाधवला संधी देण्यात आली आहे. आता त्याला पुन्हा एकदा आपल्या सिद्ध करण्याची चांगली संधी मिळाली आहे. त्यामुळे तो या संधीचे कसे सोने करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. (Kedar Jadhav in IPL)

केदारसाठी आरसीबीने मोजले 1 कोटी (Kedar Jadhav)

2019 नंतर केदार (Kedar Jadhav) टीम इंडियामधून बाहेर आहे. याशिवाय यंदाच्या लिलावातही त्याला कोणी खरेदी केले नव्हते. अखेर आयपीएलच्या मध्यातच आरसीबीने (Royal Challengers Bangalore) 38 वर्षांच्या केदारला एक कोटी रूपये मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.

2010 च्या हंगामापासून आयपीएलमध्ये पदार्पण

केदार जाधवने 2010 च्या हंगामापासून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 93 सामने खेळले असून त्यापैकी 80 डावात फलंदाजी करताना 22.15 च्या सरासरीने एकूण 1196 धावा केल्या आहेत. यादरम्यान जाधवच्या बॅटमधून 4 अर्धशतकांच्या खेळी पाहायला मिळाल्या. जाधव यापूर्वीही आरसीबी संघाचा भाग होता, ज्यामध्ये त्याला संघाकडून एकूण 17 सामने खेळण्याची संधी मिळाली.

आरसीबीकडून यापूर्वीही खेळाला

केदार जाधवसाठी आरसीबी फ्रँचायझी किंवा टीमचे खेळाडू काही नवीन नाही. तो याआधी आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळला आहे. 2016 आणि 2017 च्या हंगामात तो आरसीबीच्या ताफ्यात होता. आता पुन्हा तो विराट कोहलीच्या संघाकडून खेळताना दिसेल. केदारने आरसीबीकडून 16 डावांमध्ये 142 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहेत.

SCROLL FOR NEXT