पुढारी ऑनलाईन डेस्क : KBC 13'मध्ये हिमानी बुंदेला यांना करोडपती स्पर्धक होण्याचा मान मिळाला. मंगळवारी रात्री प्रसारित झालेल्या भागात, आग्रा येथील २५ वर्षीय शिक्षकाने नूर इनायत खानच्या एका प्रश्नाचे उत्तर देऊन १ कोटी रुपये जिंकले.
तथापि, जेव्हा तिला ७ कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिला उत्तराची खात्री नव्हती आणि तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला.
शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी हिमानीला सात कोटी रुपयांच्या जॅकपॉटसाठी डॉ. बी. आर. आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचे शीर्षक काय होते? ज्यासाठी त्यांना १९२३ मध्ये डॉक्टरेट प्रदान करण्यात आली?
या प्रश्नासाठी पर्याय होते १. द वांट्स एंड मीन्स ऑफ इंडिया २. द प्रॉब्लम ऑफ रूपी ३. नॅशनल डिविडेंट ऑफ इंडिया ४.द लॉ ऑफ लॉयर. या प्रश्नाचे उत्तर आहे, 'द प्रॉब्लम ऑफ रूपी'
त्यावेळी हिमानीने गेम सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अमिताभ यांनी त्यांना एक पर्याय निवडण्यास सांगितले. त्यावेळी हिमानीने ३ नंबरचा पर्याय निवडला होता.
जेव्हा हिमानी १५ वर्षांची होती, तेव्हा तिने एका अपघातात तिची दृष्टी गमावली. २०११ मध्ये हिमानी एका दुर्दैवी अपघाताला बळी पडली, ज्यामुळे तिची दृष्टी अंधुक झाली. अनेक शस्त्रक्रियेनंतरही डॉक्टर तिची दृष्टी वाचवू शकले नाहीत.
असे असूनही हिमानीने तिच्या आशा सोडल्या नाहीत. ती मुलांना शिकवत आहे आणि विशेषतः दिव्यांग लोकांना ज्या परिस्थितींना सामोरे जावे लागते त्याबद्दल त्यांना जागरूक करत आहे.
हे ही वाचलं का?