Latest

Karti Chidambaram : कार्ति चिदंबरम यांना विदेश प्रवास करण्यास विशेष न्यायालयाची परवानगी

backup backup
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 13, एअरसेल-मॅक्सिस तसेच आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांना विदेश प्रवास करण्यास विशेष न्यायालयाने मंगळवारी मंजुरी दिली. 25 जून ते 17 जुलै या कालावधीत स्पेन तसेच अमेरिका या देशांना चिदंबरम भेट देणार आहेत. Karti Chidambaram
एक कोटी रुपयांच्या हमीपत्रावर चिदंबरम यांना विदेशात जाण्याची परवानगी मिळाली आहे. विदेशात गेल्यानंतर कोणतेही नवीन बँक खाते उघडू नये किंवा असलेले खाते बंद करू नये. शिवाय संपत्तीचा कोणताही व्यवहार करू नये, असे निर्देशही विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती नम्रता अगरवाल यांनी सुनावणी दरम्यान दिले. कार्ति चिदंबरम यांना विदेश प्रवास करण्यास याआधीही न्यायालयाकडून मंजुरी मिळाली होती, हे विशेष. Karti Chidambaram
हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT