पुढारी ऑनलाईन डेस्क : मिस वर्ल्ड 2021 चा (Miss World 2021) किताब पोलंडच्या कॅरोलिना बिएलॉस्का हिने पटकावला, तर भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक असलेली श्री सैनी 'फर्स्ट रनर अप' ठरली. पश्चिम आफ्रिकेच्या ऑलिव्हिया येस ही दुसरी उपविजेती (सेंकड रनर अप) ठरली आहे. पोर्तोरिको येथील कोका-कोला म्युझिक हॉलमध्ये ७० वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली. मिस वर्ल्ड 2019 च्या स्पर्धेची जमैकाची टोनी-अॅन सिंग हि विजेती होती. टोनी-अॅन सिंग हिने कॅरोलिना बिलाव्स्काला मिस वर्ल्ड 2021 चा मुकुट परिधान केला. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मानसा वाराणसीला पहिल्या १० स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आले नाही.
श्री सैनी यांनी हिने स्पर्धेतील यशानंतर आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने तिचा लहानपणीचा फोटो शेअर करत, दिलेल्या संदेशात म्हणते , "जेव्हा मिस वर्ल्ड सुरू झाले तेव्हा मी फक्त ६ वर्षांची होते. तेव्हापासून मी मिस वर्ल्डचे स्वप्न पाहत होते. त्यावेळी मी वेशभूषा करून, स्वत: मध्ये मिस वर्ल्ड पाहत होते. त्यानंतर ती म्हणते की, लोकांना जीवन जगताना अनेक समस्यांचा सामनी करावा लागतो, परंतु कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहणे हा मुलभूत अधिकार आहे. मला या यशाच्या माध्यमातून, लोकांना त्यांच्यातील प्रकाश पाहण्यासाठी आणि त्यांना प्रकाशमान होण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. ️कृपया हीच प्रार्थना सर्वांनी करावी, असे म्हणत तिने सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.
श्री सैनी ही अमेरिकेतील वॉशिंग्टनची रहिवाशी आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, सैनी १२ वर्षाची असताना एका अपघातामुळे तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली होती. तरीही तिने हार मानली नाही. तिच्या याच प्रयत्नामुळे आज तिने हा खिताब मिळवला आहे. ती वॉशिंग्टनमध्ये अनेक गरजू लोकांना सामाजिक सेवाही देत आहे. तसेच ती एमडब्ल्यूए नॅशनल ब्युटी विथ पर्पजच्या अॅम्बेसेडरदेखील आहे.
युद्धग्रस्त युक्रेनशी एकता दर्शविण्यासाठी पोर्तो रिकोमध्ये Miss World 2021 स्पर्धेदरम्यान मेणबत्त्या पेटवून एक गाणे गायले आणि जगाला एकत्मतेचा संदेश दिला . 2019 च्या विजेत्या जमैकाच्या टोनी अॅन सिंगने असे गाणे गायले की तेथे उपस्थित असलेले सर्वजण भावूक झाले आणि स्पर्धक आणि प्रेक्षकांनी मेणबत्त्या पेटवून युक्रेनला पाठिंबा दिला.