Latest

Karnataka Election २०२३ Live : कर्नाटकात दुपारी ३ वाजेपर्यंत ५२.०३ टक्‍के मतदान

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : कर्नाटकात मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली असून कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. कर्नाटकात मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तीव्र ऊन असतानाही मतदारांनी उत्साहात मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. विशेष म्हणजे मतदान केंद्रांवर महिलांची देखील लक्षणीय संख्या आहे. सकाळी ९ पर्यंत पहिल्या दोन तासात ८.२१ टक्के मतदान झाले आहे. तर अद्ययावत आलेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजेपर्यंत २०.९४ टक्के मतदान झाले आहे.

मुख्यमंत्री बोम्मई, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, अभिनेता प्रकाश राज, इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती, ज्येष्ठ लेखिका सूधा मूर्ती, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच यावेळी नारायण मूर्ती-सूधा मूर्ती यांनी तरुणांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान मतदानापूर्वी निवडणूक आयोगाकडून सर्व ठिकाणी तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत असणार आहे. कर्नाटकात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

live update :

कर्नाटक विधानसभेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत एकुण सुमारे 52.03 टक्के मतदान झाले आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यात सरासरी 37 टक्के मतदान, सर्वाधिक 45% कुडची मतदारसंघात, तर सर्वात कमी रामदुर्ग येथे 27 टक्के मतदान झाले आहे.

वडगाव मधील जेल शाळेजवळ बूथ चालकांनी एक टेबल व दोन खुर्च्यांपेक्षा अधिक खुर्च्या ठेवल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी काही खुर्च्या जप्त केल्या व बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना धारेवर धरले.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सपत्नीक मतदान केले 

खा. मंगल अंगडी यांनी मतदान केले. 

एकसंबा येथे जोले कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

कर्नाटकात दुपारी १ वाजेपर्यंत ३७.२५ टक्‍के मतदान

न्यू वंटमुरी केंद्रावर मतदारांची रांग लागली होती. 

रायबागचे आमदार व भाजपा उमेदवार दुर्योधन ऐहोळे मतदानाचा हक्क बजावताना. 

सदाशिवनगर येथे एका ठिकाणी पिंक बूथ असे सजवले होते.

सकाळच्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत तुरळक गर्दी दहानंतर सर्वच मतदान केंद्रांवर रांगा बेळगाव दक्षिण मध्ये 11 वाजेपर्यंत सरासरी 25 टक्के मतदान 

शहापूर ला चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेजमध्ये लागलेली रांग 

एकत्र मतदानानंतर अनेक कुटुंबांना सेल्फीचा मोह आवरला नाही. चिंतामणराव पटवर्धन पदवीपूर्व कॉलेज मधील छायाचित्र 

कागवाड चे आमदार श्रीमंत पाटील व युवा नेते श्रीनिवास पाटील यांनी कुटुंबीयांसह कागवाड येथे मतदान केले

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या शोभा करंदलाजे मतदान करण्यासाठी बेंगळुरू येथील मतदान केंद्रावर पोहोचल्या.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि कनकापुरा येथील पक्षाचे उमेदवार डीके शिवकुमार यांचे नागरिकांना आवाहन म्हणाले , "…मी सर्वांना आवाहन करतो, कृपया आमचे गॅस सिलिंडर पाहून मतदान करा. मी माझ्या सर्व नेत्यांना बूथच्या बाहेर गॅस सिलिंडर ठेवण्याचा सल्ला दिला आहे."

बेळगावात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. विश्वेश्वरी विश्वेश्वरय्या नगर येथील मतदान केंद्रावर एक वृद्ध मतदानासाठी आले होते. त्यांना मतदानासाठी आत जाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढे होऊन मदत केली. प्रारंभी इतकी गर्दी नव्हती. परंतु नंतर वाढणारे ऊन लक्षात घेता मतदानासाठी साडेआठ नंतर गर्दी होण्याची शक्यता आहे. 

आपल्या कुटुंबियासमवेत बोरगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील

जयनगर, बेंगळुरू | सुधा मूर्ती यांनी मतदान केल्यानंतर तरुण मतदारांना संदेश दिला ; म्हणाल्या, "कृपया आमच्याकडे पहा. आम्ही वृद्ध आहोत पण आम्ही ६ वाजता उठतो, इथे येऊन मतदान करा. कृपया आमच्याकडून शिका. मतदान हा लोकशाहीचा पवित्र भाग आहे…"

"प्रथम, आम्ही मतदान करतो आणि नंतर आम्ही म्हणू शकतो की हे चांगले आहे, हे चांगले नाही परंतु जर आम्ही तसे केले नाही तर आम्हाला टीका करण्याचा अधिकार नाही," असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी बेंगळुरूमध्ये मतदान केल्यानंतर सांगितले.

कर्नाटक विधानसभा निवडणूक: माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शिवमोग्गा येथे मतदान करण्यापूर्वी मंदिराला भेट दिली

बंगळुरूच्या शांती नगर येथील सेंट जोसेफ स्कूलमधील मतदान केंद्रावर अभिनेते प्रकाश राज मतदान करण्यासाठी पोहोचले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील लोकांना "राज्यातील सुशासन, विकास आणि समृद्धीसाठी" मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. "तुमचे एक मत एक लोकाभिमुख आणि प्रगती समर्थक सरकार सुनिश्चित करू शकते जे राज्याला नवीन उंचीवर नेत राहील," त्यांनी ट्विट केले.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT