Latest

करीना कपूरने कंगनाला दिलेल्या शुभेच्छा पाहून नेटकऱ्यांना धक्का

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अदाकारा कंगना रानौतचा आज ३५ वा वाढदिवस आहे. या खास दिनी कंगनाला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. कंगना इंडस्ट्रीची सर्वात यशस्वी अदाकारांपैकी एक आहे. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. फॅन्ससोबतच सेलिब्रिटीजदेखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. इंडस्ट्रीतील बेबो कपूर खाननेही कंगनाला तिच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. करीना कपूर खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगनाचा एक फोटो शेअर करून तिला प्रेम पाठवले आहे. करीना कपूर खानने शुभेच्छा देत लिहिले आहे, 'माझी प्रिय मित्र कंगना राणौत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू सदैव आनंदी राहा आणि अशीच चमकत राहा.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या पोस्टने लोकांना धक्का बसला आहे. करीना कपूर खान ही अभिनेत्री कंगना राणौतची फारशी चांगली मैत्रीण नाही. अशा परिस्थितीत तिच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. करीनाला अचानक असे काय झाले की तिने कंगनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असे काही नेटकरी प्रश्न विचारत आहेत.

कंगना रामायणवर आधारित सीता-द इनकार्नेशन हा चित्रपट सुरू करणार आहे. या चित्रपटासाठी निर्माते पहिल्यांदा करीनाच्या नावाचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण, बेबोने वाढवलेल्या फीमुळे निर्मात्यांनी आपला मोर्चा कंगना राणौतकडे वळवला. कंगनाची सध्या क्रेझ आहे. तिच्या झोळीत अनेक चित्रपट आहेत. चित्रपट सीता हा चित्रपट कंगनाच्या कारकिर्दीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे.

हेदेखील वाचा –

SCROLL FOR NEXT