Latest

Kapil sibal : पंतप्रधानांकडून पुरावे मागण्याची हिंमत का होत नाही; सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला सवाल

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने भाजपविरोधात केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोग काँग्रेसकडून पुरावे मागते, पण जेव्हा काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांसोबत सौदेबाजी करतो, असा आरोप पंतप्रधान करतात, तेव्हा त्यांच्याकडून आयोग पुरावे का मागत नाही, असा सवाल राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेस मागच्या दाराने दहशतवाद्यांसोबत सौदेबाजी करते, हा पंतप्रधानांचा आरोप गंभीर आहे. मग याबाबत आयोग पुरावे का मागत नाही, की आयोगाकडे पंतप्रधानांकडून पुरावे मागण्याची हिंमत नाही, असे सिब्बल यांनी नमूद केले. भाजपच्या भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड काँग्रेसने जाहिरातींच्या माध्यमातून जारी केले होते. त्यावरून सध्या कर्नाटकात मोठा गदारोळ उडालेला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT