Latest

Kapil Dev : सूर्यकुमारवर कपिल देव यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी, विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, ए.बी. डिवीलियर्स विराट कोहली आणि रिकी पाँटींग यांच्यासारखे महान फलंदाज पाहिले. मात्र, फार कमी लोक इतक्या सहजपणे षटकार लगावू शकतात. हे सूर्यकुमार यादवच करू शकतो. त्याच्यासारखे खेळाडू शतकातून एकदाच तयार होतात, असे मत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले. (Kapil Dev)

सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूमध्ये ११२ धावांची शतकी खेळी केली. सूर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १३७ धावांपर्यंतच पोहचू शकला. यानंतर कपिल देव सूर्यकुमारचे कौतुक करताना म्हणाले की, माझ्याकडे त्याचे कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत. (Kapil Dev)

कपिल देव पुढे बोलताना म्हणाले, भारतात खरोखरच खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. सूर्यकुमार त्यांपैकी एक आहे. विवियन रिचर्डस किंवा सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या महान फलंदाजांसोबत तुलना होणे हे कोणत्याही खेळाडूसाठी गर्वाची बाब आहे. हे असे खेळाडू आहेत जे क्रिकेटमध्ये शीर्षस्थानीच पोहोचवले नाही तर अनेक विक्रम आपल्या नावावर केली आहे. परंतु, भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांना असे वाटते की, भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने क्रिकेटच्या सर्व व्याख्या बदलल्या आहेत. (Kapil Dev)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT