Latest

Kala Chashma Dance : ‘काला चष्मा’ या गाण्यावर मुलांनी असा केला डान्स की..

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, ज्यावर केवळ लोकांच्या आवडीचा मजकूरच नाही तर ट्रेंडिंग मटेरिअलही मिळतो. (Kala Chashma Dance ) यामुळेच लोक नेहमी सोशल मीडियाशी कनेक्ट राहणे पसंत करतात. व्हिडीओ वगैरे सोशल मीडियावर इतके व्हायरल होतात की ते कधी चर्चेचा विषय बनतात ते कळत नाही. असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (Kala Chashma Dance )

हा व्हिडिओ दुसर्‍या देशाचा असल्याचा दिसत असला तरी तो कुठला आहे हे पूर्णपणे सांगणे कठीण आहे. मात्र, परदेशी मुलांचा या व्हिडिओमध्ये भारतातील सुंदर तडका स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनेक मुले अतिशय सुंदर नृत्य करताना दिसत आहेत.

२०१८ च्या बॉलीवूड चित्रपट 'बार बार देखो' मधील 'काला चष्मा' गाण्यावर मुले नाचताना दिसत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कॅटरिना कैफ यांनी या गाण्यावर उत्तम परफॉर्मन्स दिला आहे.

उत्कृष्ट संगीत असलेले हे गाणेही खूप गाजले आहे. पण कू वर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आणि त्यात नाचणारी मुलं प्लॅटफॉर्मवर चांगलीच पसंती देत आहेत. तारक फताह नावाच्या युजरने तो शेअर केला आहे. तारक फताह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, हा व्हिडीओ एडिट केलेला असो वा ओरिजिनल, पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल की तो खरोखरच कौतुकास पात्र आहे. मुलांनी केलेल्या स्टेप्स असे जुळतात की जणू ते त्याच गाण्यावर नाचत आहेत. बरं, हे एडिटिंग आहे की मूळ हे सांगता येत नाही, पण व्हिडिओ खूपच अनोखा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT