पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अगरवाल (Kajal Aggarwal) आणि गौतम किचलू लवकर आई-बाबा होणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोशल मीडियावर पती गौतम किचलूने फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांशी ही गूडन्यूज दिली आहे. (Kajal Aggarwal good news)
Kajal Aggarwal good news
अभिनेत्री काजल अग्रवाल साउथ इंडस्ट्रीमध्ये आपली एक ओळख निर्माण केली आहे. तिची सिंघम चित्रपटातील भूमिका खूप गाजली. यातील भूमिकेने तिला एक ओळख मिळाली. बाॅलीवूडमध्ये तिला सिंघम गर्ल म्हणूनही ओळख जाते. काजलने २०२० मध्ये उद्योगपती असलेल्या गौतम किचलूशी (Gautam Kitchlu) लग्न केले होते. अलिकडेच त्या दोघांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
सोशल मीडियावर काजलच्या प्रेगन्सीबाबत चर्चा रंगत होत्या.अखेर गौतमने काजलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमूळे निश्चित झाले की, काजल आणि गौतम आई-बाबा होणार आहेत. फोटोला गौतमने कॅप्शन दिली आहे की, २०२२ वर्ष तुमची वाट पाहत आहे. सोशल मीडियावर काजल आणि गौतमवर शूभेचछांचा वर्षाव होवू लागला आहे. काजल आणि गौतमने शेअर केलेले हे फोटो व्हायरल झाले आहेत. २०२० मध्येही त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Kajal Aggarwal : प्रेग्रेंसीमुळे काजल नागार्जुनच्या चित्रपटातून बाहेरनागार्जुनच्या आगामी चित्रपटात काजल होती. मात्र, तिला प्रेग्नेंट असल्यामुळे रिप्लेस करण्यात आलं आहे.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.