Latest

के. कविता यांची ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांची सक्तवसुली संचलनालयाने सोमवारी (दि.२०) चौकशी केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ईडीने कविता यांची चौकशी केली होती.

तेलंगण विधान परिषदेच्या सदस्या असलेल्या कविता या राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपला तेलंगणमध्ये मागच्या दाराने प्रवेश करावयाचा आहे. त्यासाठीच बीआरएसच्या नेत्यांना तपास संस्थांच्या माध्यमातून प्रताडीत केले जात असल्याचा आरोप चंद्रशेखर राव यांनी केला होता. सदर प्रकरणात दिलासा देण्याबाबतची विनंती याचिका कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर 24 मार्चला सुनावणी होणार आहे. मद्य धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेला हैदराबादचा उद्योगपती अरुण पिल्ले हा के. कविता यांच्यासाठी काम करीत असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT