बीआरएस आमदार के. कवितांना दिलासा नाहीच | पुढारी

बीआरएस आमदार के. कवितांना दिलासा नाहीच

नवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा- राजधानी दिल्लीतील तथाकथित आबकारी घोटाळ्याप्रकरणी भारत राष्ट्रीय समितीच्या (बीआरएस) आमदार तसेच तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात कविता यांनी दाखल केलेल्या याचिकेला यादीबद्ध करीत न्यायालय २४ मार्चला सुनावणी घेणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना प्रश्न विचारले जातात. हे चुकीचे आहे. सर्वांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. भाजपने सर्वात अगोदर व्यापारी घरांवर धाडी घालत त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी राजकीय पक्षांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्ही संघर्ष करून आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. जेव्हाही आम्हाला बोलावले जाईल, तेव्हा आम्ही जावू आणि उत्तर देवू, अशी भावना के.कविता यांनी व्यक्त केली.

संसदेत महिला आरक्षण विधेयक तत्काळ सादर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.संसदेत त्यामुळे महिलांची भागीदारी वाढवण्यास मदत मिळेल. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसला देखील बैठकीत उपस्थित राहण्याची विनंती केल्याचे कविता म्हणाल्या.

Back to top button