Latest

K. Kavita: के. कविता याच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, CBI ला नोटीस

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: बीआरएस नेत्या के. कविता यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मागितला होता. यासाठी त्यांनी दिल्ली राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडे अर्ज केला होता. दरम्यान न्यायालयाने के.कविता यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यांच्या अंतरिम जामिनावर सोमवार २२ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने आज (दि.१५) स्पष्ट केले. दरम्यान आजच्या सुनावणीत दिल्ली सत्र न्यायालयाने के.कविता यांची न्यायालयीन कोठडीत मंगळवार २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. (K. Kavita)

दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित सीबीआय खटल्याच्या संदर्भात बीआरएस (BRS) नेते के कविता यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला (CBI) न्यायालयाने नोटीस बजावली होती. पुढे आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. (K. Kavita)

के. कविता यांनी याचिकेद्वारे अंतरिम दिलासा मागताना म्हटले आहे की, त्यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) तिला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांची 'स्टार प्रचारक' म्हणून घोषित केले आहे .यासाठी तिला शनिवार २० एप्रिल ते ११ मे या कालावधीत निवडणूक ड्युटी निर्धारित केली आहे, त्यामुळे निवडणुक प्रचारासाठी अर्ज करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (K. Kavita)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT