Latest

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड राष्ट्रीय कायदे सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी

नंदू लटके

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय कायदे सेवा प्राधिकरणाच्या (एनएएलएसए) अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे. कायदा मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती उदय लळीत यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिकामे झाले होते.

लीगल सर्व्हिसेस ऍथोरिटीज ऍक्ट, 1987 नुसार समाजातील दुर्बल घटकांना कायदेविषयक सेवा देण्यासाठी राष्ट्रीय कायदे सेवा प्राधिकरणाची (एनएएलएसए) स्थापना करण्यात आली आहे. देशाचे सरन्यायाधीश हे प्राधिकरणाचे संरक्षक असतात तर ज्येष्ठतेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्यायमूर्ती या संस्थेचे अध्यक्ष असतात. सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्यापूर्वी चंद्रचूड हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. तत्पूर्वी ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT