Latest

Jubin Nautiyal : जुबिनने रुग्णालयातून फोटो केला शेअर; रॅपर बादशाहने केली प्रार्थना 

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल इमारतीच्या पायऱ्यांवरून घसरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला हाताला दुखापत झाली आहे. आता जुबिनने रुग्णालयातून फोटो शेअर केला आहे. त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत होते. आता त्याने रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे, जो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतो. तो रुग्णालयाच्या बेडवर बसून जेवताना दिसत आहे. जुबिनच्या हाताला फ्रॅक्चर दिसत आहे.

आपला फोटो शेअर करत जुबिनने लिहिलंय, 'आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी धन्यवाद. परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे आणि त्या दुर्घटनेतून मला वाचवलं. मला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी बरा होत आहे. आपले कधीही न संपणारे प्रेम आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद.'
जुबिनने फोटो पोस्ट केल्यानंतर त्याचे चाहते, मित्र आणि सेलिब्रिटीज त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

गायक-रॅपर बादशाहने लिहिलं, 'माझ्या भावा लवकर बरा हो.' गायिका कनिका कपूरनेदेखील कमेंट करून ल वकर ठीक होण्यासाठी प्रार्थना केली. शुक्रवारी जुबिन पायऱ्यांवरून पडून जखमी झाला होता.

जुबिनने रात लांबिया, लूट गए, हमवा मेरे आणि तुझे कितना चाहने लगे हम, तुम ही आना, बेवफा तेरा मासूम चेहरा या गाण्यांना त्याने स्वरसाज चढविला आहे. जुबिनने गेल्या आठवड्यातच दुबईमध्ये एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले होते. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, 'दुबईतील लोकांसमोर परफॉर्म करणे हा एक वेगळा अनुभव आहे. मी येथे परफॉर्म करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो आणि माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहीन. उत्सवांचा हंगाम काही दिवसांत सुरू होणार आहे आणि मला उत्सव सुरू करण्यासाठी संगीतापेक्षा चांगले काहीही वाटत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT