Latest

Johnson and Johnson : तडजोडीसाठी जॉन्सन आणि जॉन्सन कडून 890 कोटी डॉलरची ऑफर

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Johnson and Johnson : अमेरिकेतील प्रसिद्ध जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने आपल्यावर केलेले दावे मागे घेऊन तडजोडीसाठी 890 कोटी अमेरिकी डॉलर (73086 करोड रुपये) देण्याची ऑफर दिली आहे. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन (Johnson and Johnson) ही खास करून लहान मुलांसाठी टॅल्कम पावडर, तेल, शाम्पू इत्यादी उत्पादने तयार करते. कंपनीवर एक दोन नव्हे तर हजारो केसेस करण्यात आल्या आहेत.

जॉन्सन आणि जॉन्सन (Johnson and Johnson) कंपनी न्यू जर्सी स्थित आहे. कंपनीने आपल्यावरील दाव्यांचा निपटारा करण्यासाठी ही ऑफर दिली आहे. यापूर्वीही कंपनीने अशी 200 कोटींची ऑफर दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की ही प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. यासाठी न्यायालयाकडून अनुमोदन घ्यायला हवे.

कंपनीच्या म्हणण्यासानुसार कॉस्मेटिक टॅल्कम पावडर वर सुरू असलेल्या खटल्या दरम्यान सर्व दाव्यांना समान स्वरुपात एकाचवेळी प्रभावीपणे त्यांना निकाली काढता येतील. जर सेटलमेंट न्यायालयाने आणि बहुसंख्य वादींनी मंजूर केले तर, $8.9 बिलियन सेटलमेंट युनायटेड स्टेट्समधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सेटलमेंटपैकी (Johnson and Johnson) एक असेल. या पातळीचे करार आतापर्यंत फक्त तंबाखू कंपन्या आणि अगदी अलीकडे, ओपिओइड उत्पादकांनी केले आहेत.

Johnson and Johnson : नेमके काय आहेत आरोप?

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन (Johnson and Johnson) विरोधात एक दोन नव्हे तर हजारो दावे करण्यात आले आहे. कंपनीच्या टॅल्कम पावडरमध्ये ओवेरियन कँसर निर्माण करणाऱ्या एस्बेस्टसचे अंश आहेत. असा दावा या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, कंपनीने कधीही या दाव्यांना मान्य केले नाही. मात्र, सुरू असलेल्या खटल्यांमुळे त्यांनी 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये आपले टॅल्कमवर आधारित उत्पादने विकणे बंद केले होते.

जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) येथील खटल्याचे उपाध्यक्ष एरिक हास यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "कंपनीचा विश्वास आहे की हे दावे खोटे आहेत आणि त्यात वैज्ञानिक तथ्ये नाहीत."

जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson and Johnson) मते, पुढील 25 वर्षांमध्ये हजारो दावेदारांना LTL मॅनेजमेंट एलएलसीच्या उपकंपनीद्वारे US$890 दशलक्ष देण्यास तयार आहे. हे दावे हाताळण्यासाठी LTL मॅनेजमेंट LLC ची स्थापना करण्यात आली आणि दिवाळखोरी संरक्षणासाठी दाखल केले.

Johnson and Johnson : तडजोडीचा हा प्रस्ताव म्हणजे चुकीची कबुली नाही

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन (Johnson and Johnson) कडून यापूर्वीही अशा प्रकारे दावे निकाली काढण्यसाठी 200 कोटीची ऑफर देण्यात आली होती. मात्र, एलटीएल मॅनेजमेंट एलएलसीच्या या प्रस्तावाला अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर कंपनीने आता हा नवीन प्रस्ताव दिला आहे. कंपनीने म्हटले आहे, अशा प्रकारचा प्रस्ताव दिला याचा अर्थ असा नाही की कंपनीने चुकीच्या कामाचा कबुलनामा दिला आहे. कंपनीची टॅल्कम उत्पादने सूरक्षित आहे. या आपल्या दाव्यावर कंपनी अजूनही कायम आहे. मात्र ही प्रकरणे जेवढ्या लवकर आणि जितक्या प्रभावीपणे सोडवली जातील ते तितकेच कंपनी आणि दावेदार यांच्या हिताचे राहील.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT