Latest

New York Job Offer :’या’ शहरात उंदीर पकडण्यासाठी नोकरभरती; पगार १ कोटी, जाणून घ्या पात्रता…

backup backup

पुढारी; ऑनाईल डेस्क : आजकाल, परदेशातल्या नोकऱ्यांबद्दलची माहिती घेण्याबद्दल नेहमी कुतुहल असते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका नोकरीची खूप चर्चा आहे, ज्याचा पगार भारतातील सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा जास्त आहे. ही नोकरी आहे उंदीर पकडण्यासाची. (New York Job Offer)

या न्यूयॉर्क शहरात उंदरांची संख्या खूप वाढली आहे आणि यामुळे सामान्य लोक प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे येथील महापौरांनी बुधवारी (दि.३०नोव्हेंबर) न्यूयॉर्कमध्ये उंदीर मारण्यासाठी नोकर भरती जाहीर केली आहे. शहराच्या स्वच्छता विभागाने सांगितले आहे की, न्यूयॉर्कमध्ये दोन वर्षांत उंदरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर घरांमध्येही उंदीर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. उंदरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने न्यूयॉर्कची परिस्थिती आता चिंताजनक बनली आहे. वाढत्या कचऱ्यामुळे शहरात उंदरांची संख्या वाढत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. (New York Job Offer)

महापौर एरिक अॅडम्सच्या कार्यालयाने या आठवड्यात एक जॉब लिस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, आम्हाला उंदीर पकडणाऱ्यांची गरज आहे आणि तुम्ही न्यूयॉर्क शहरातील 'रॅट जार' होऊ शकता.

पगार कोट्यावधीत

नोकरीसाठी अर्जदार हा न्यूयॉर्क शहरातील असावा अशी या नोकरीसाठी अट आहे. तसेच अर्जदाराने पदवी उत्तीर्ण केलेली असावी. निवड झालेल्या व्यक्तीला 120 हजार डॉलर (97 लाख 72 हजार 800 रुपये) ते 170 हजार डॉलर (एक कोटी 38 लाख 44 हजार 800 रुपये) वेतन मिळेल. शिकागो शहरात सर्वाधिक उंदीर आहेत आणि त्याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT