OYO Layoff Employee : 'ओयो' करणार भारतातील ६०० कर्मचाऱ्यांची कपात | पुढारी

OYO Layoff Employee : 'ओयो' करणार भारतातील ६०० कर्मचाऱ्यांची कपात

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील हॉटेल व्यवसायाशी कनेक्टेड असणाऱ्या Oyo कंपनीने कर्मचारी कपातीबाबतची मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या उत्पादन आणि अभियांत्रिकी या दोन्ही विभागामधील जवळपास 600 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचे पाऊल कंपनीने उचललेले आहे. कंपनीने याबाबत माहिती देत असताना दोन्ही विभागांचे विलीनीकरण करण्यात येईल असे सांगितले आहे. ShareChat नंतर आता Oyo ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी दुसरी स्वदेशी कंपनी ठरली आहे. (OYO Layoff Employee)

OYO ने दिलेल्या माहितीनुसार हे पाऊल त्यांच्या संघटनात्मक संरचनेत व्यापक बदलांची अंमलबजावणी करण्याचा एक भाग आहे. कंपनीच्या उत्पादन आणि अभियांत्रिकी, कॉर्पोरेट मुख्यालय आणि OYO व्हेकेशन होम्स विभागांवरील खर्चाचा ताण कमी करत आहे. जे भागीदार आहेत त्यांच्या व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास संघांमध्ये या लोकांना जोडण्याचा प्रयत्न करेल. (OYO Layoff Employee)

हेही वाचा

Back to top button