कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने पोटनिवडणुकीत काय होणार ? शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द राखणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, कट्टर शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द राखल्याचे प्रभागांमध्ये झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रभाव असलेल्या सिद्धार्थ नगर, बुधवार तालीम, खोलखंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका भागात जयश्री जाधव यांना लीड मिळाल्याचे दिसून आले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांचा स्वर्गस्वासी चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवताना क्षीरसागर यांचा पराभव केला. मात्र, चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने पोटनिवडणूक लागली.
या निवडणुकीत राजेश क्षीरसागर हक्काचा मतदारसंघ असल्याने मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रही होते. तथापि, हा मतदारसंघ सतेज पाटील यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे क्षीरसागर नाराज झाले होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर त्यांनी नाराजी दूर प्रचारात झोकून दिले.
हे ही वाचलं का ?