Latest

Javed Akhtar: महिलांनादेखील एकाहून अधिक पती करण्याचा हक्क मिळावा : जावेद अख्तर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जावेद अख्तर अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात अडकतात. यावेळी त्यांनी (Javed Akhtar) कॉमन सिव्हिल कोडविषयी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे चर्चेला उधाण आहे. एका मुलाखतीत कॉमन सिव्हिल कोडचा अर्थ समजवत जावेद अख्तर म्हणाले की, मला एक मुलगा आणि मुलगी आहे. जर मला माझी संपत्ती द्यायची असेल तर मी दोघांना बरोबर हिस्सा देईन. जावेद अख्तर (Javed Akhtar) म्हणाले की, कॉमन सिविल कोडचा अर्थ केवळ सर्व समुदायांसाठी एक कायदा असत नाही तर महिला आणि पुरुषांसाठीदेखील एक समान कायदा हवा. महिलांनादेखील मिळावे एकाहून अधिक पती करण्याचा अधिकार मिळावा. जर असे नसेल तर बरोबरी कशी? त्यांच्या या वक्तव्यावरून काही लोक जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आहेत.

सोशल मीडियावर चर्चा

जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या विधानावर टीका केली. या विधानावर जावेद अख्‍तर यांनी माफी मागावी, अशीही मागणी केली जातीय.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT