Latest

Golf Coach Jaskirat Singh Grewal : द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेले जसकीरत सिंग ग्रेवाल ठरले देशातील पहिले गोल्फ प्रशिक्षक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रीडा मंत्रालयाने वार्षिक क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकित खेळाडूंच्या नावांवर मोहोर उमटवली आहे. खेळाडूंशिवाय प्रशिक्षकांना देण्यात येणारे पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. गोल्फ प्रशिक्षक जसकीरत सिंग ग्रेवाल यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळालेले ते पहिले गोल्फ प्रशिक्षक ठरले आहेत. Golf Coach Jaskirat Singh Grewal

संबंधित बातम्या 

प्रसिद्ध गोल्फ प्रशिक्षक जसकीरत सिंग ग्रेवाल यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी (जीवनगौरव) निवड झाली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल गोल्फ प्रशिक्षक जसकीरत सिंग ग्रेवाल यांनी सरकारचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार देऊन सरकारने विशेष सन्मान केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. Golf Coach Jaskirat Singh Grewal

चंदीगडचे रहिवासी ६४ वर्षीय जसकीरत सिंग ग्रेवाल, जे सी ग्रेवाल या नावाने प्रसिद्ध आहेत.द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाल्‍यानंतरग्रेवाल म्हणाले की, आज अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मिळाले आहे. सरकारने आम्हाला विशेष सन्मान दिला आहे. गोल्फ हा मुख्य प्रवाहातील खेळ नसला तरी या खेळाची निवड केली आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे गोल्फ खेळाला चालना मिळेल. याआधी अर्जुन पुरस्काराशिवाय इतर कोणताही पुरस्कार या खेळासाठी देण्यात आलेला नाही. या वर्षी पुरस्कारासाठी वैयक्तिकरित्या अर्ज घेतले गेले होते. कोणत्याही फेडरेशनच्या माध्यमातून अर्ज मागविले नव्हते.

जसकीरत सिंग ग्रेवाल यांनी अनेक गोल्फपटूंना प्रशिक्षित केले

चंदीगड गोल्फ रेंज (CGA) चे संचालक असलेले जसकीरत सिंग ग्रेवाल यांनी शहरातील अनेक गोल्फपटूंना प्रशिक्षित केले आहे. त्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली आहे. शुभंकर शर्मा, अजितेश संधू, आदिल बेदी असे अनेक व्यावसायिक खेळाडू त्यांच्या कोचिंगखाली तयार झाले आहेत. तरुण खेळाडुंच्या गुणांना वाव देण्यासाठी ग्रेवाल 1998 पासून CGA मध्ये काम करत आहेत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ९ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT