Latest

Maratha Reservation : शिष्टमंडळ भेटीनंतर जरांगेंचे मत परिवर्तन; म्हणाले ‘हे आपलं सरकार…’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनावर ठाम असलेल्या जरांगे पाटील यांना आज (दि. २१) शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, गिरीष महाजन, संदीपान भुमरे यांचा समावेश होता. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी सध्याचं सरकार हे आपले सरकार असून, आपण त्यांच्या शब्दाचा वेळोवेळी मान राखला आहे. सरकार आपल्यासाठी नक्की योग्य निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. (Maratha Reservation)

जरांगे पाटील यावेळी बोलत असताना म्हणाले की, हे सरकार आपलं आहे. आपलं सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेतील. आपण प्रत्येकवेळी सरकारच्या शब्दाचा मान राखला आहे. चर्चेतून मार्ग नक्की निघाणार असं जरांगे पाटील म्हणाले. बीडमधील घटनांमुळे नोटीसा दिल्या असतील. पण नोटीसा दिल्या नंतरही आम्ही लढा कायम ठेवणार आहे. तसेच सरकारकडे २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ असल्याचे देखील ठामपणे सांगितले. (Maratha Reservation)

जरांगे पाटील यांनी सरकारला यापूर्वी २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. आज त्यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ गेले होते. या शिष्टमंडळाच्या वतीने बोलत असताना भाजप नेते गिरीष महाजन यांनी सोयरे या शब्दावरुन गोंधळ झाल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच सरकार यासंबंदी योग्य तो निर्णय घेईल असे महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT