पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर इतर देशही चंद्रावर पोहचण्यासाठी सरसावले आहेत. यानंतर जपानने चंद्रावर जाण्यासाठी पावले उचलली आहेत. जपानची अंतराळ संस्था Japan Exploration Agency (JAXA) ने आज सकाळी आपली चंद्र मोहीम 'मून स्निपर'चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हे प्रक्षेपण तानेगाशिमा अंतराळ केंद्रातून एच-आयआयए (H-IIA) रॉकेटद्वारे करण्यात आले. खराब हवामानामुळे गेल्या महिन्यात एका आठवड्यात तीनवेळा मिशन स्थगित केल्यानंतर, जपानने शेवटी असे करण्यास यश मिळविले.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) ने सांगितले की, दक्षिण जपानमधील तानेगाशिमा स्पेस सेंटर येथून जपानच्या 'मून स्निपर'चे यशस्वी प्रक्षेपण झाले असून, इस्रोने देखील जपानच्या या मोहिमेला त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
जपान दीर्घकाळापासून आपल्या चंद्र मोहिमेवर काम करत आहे. जपानच्या चंद्र मोहिमेत अनेक गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत स्मार्ट लँडर (SLIM) चंद्रावर तपासणीसाठी उतरणार आहे. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) 'H2A रॉकेट'द्वारे चंद्रावर पाठवत आहे. जपानचा SLIM प्रकल्प 'मून स्निपर' म्हणून ओळखला जातो. यामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात उच्च तंत्रज्ञानाचे कॅमेरे आहेत, जे चंद्राला समजून घेण्याचे काम करतील. पुढील वर्षाच्या सुरुवातीला SLIM चे चंद्रावर उतरण्याचे नियोजन आहे.
विश्वाच्या निर्मितीचा तपास करण्यासाठी जपानने या चंद्र मोहिमेची खास रचना केली आहे. यात एक्स-रे इमेजिंग उपग्रहही असेल. याशिवाय एक स्मार्ट लँडरही पाठवण्यात आला आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरण्याचा प्रयत्न करेल. जपानी स्पेस एजन्सी H2A रॉकेटद्वारे मून स्नाइपर चंद्रावर पाठवत आहे. मून स्निपरमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे चंद्राला समजून घेण्याचे काम करतील.
जपान दीर्घकाळापासून आपल्या चंद्र मोहिमेवर काम करत आहे. जपानच्या चंद्र मोहिमेत अनेक गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावर तपासणी करण्यासाठी स्मार्ट लँडर उतरवावे लागेल. जपानी रॉकेटमध्ये स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) हे हलके वजनाचे चंद्र लँडर देखील आहे. स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट लँडर प्रक्षेपणानंतर तीन किंवा चार महिने चंद्राभोवती फिरणार आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.