Latest

Janhvi Kapoor : जान्हवी-खुशी तिरुपती बालाजीच्या चरणी नतमस्तक (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बोनी कपूर-श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचली. तिथे तिने पारंपरिक कपड्यांमध्ये तिरुमाला बालाजी मंदिरात पूजा-अर्चा केली. तिरुमाला बालाजी मंदिरात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor ) एकटी नाही तर तिच्यासोबत बहिण खुशी कपूरदेखील दिसलीय. तिरुमाला बालाजी मंदिरात दर्शनसाठी जान्हवी कपूर, खुशी कपूर सोबत जान्हवीचा मित्र शिखर पहाडियादेखील उपस्थित होता. सर्वानी दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. दरम्यान जान्हवी आणि खुशीसोबत जवळचे लोकदेखील उपस्थित होते. (Janhvi Kapoor )

जान्हवी कपूरने सुरू केली NTR 30 चे शूटिंग

जान्हवी कपूर आरआरआर फेम स्टारचा आगामी चित्रपट एनटीआर ३० मधून तेलुगू सिनेमामध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोराटला शिवा करत आहेत. ज्युनियर एनटीआरने इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओज शेअर केले आहेत. त्याने शूटिंग सुरू होण्याची माहिती दिलीय. व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणताना दिसतोय- "मी येत आहे."

चित्रपट धडकमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या जान्हवीच्या झोळीत अनेक चित्रपट आहेत. एनटीआर 30 शिवाय बवाल, बडे मिया छोटे मिया, मिस्टर अँड मिसेस, माही आणि तख्त यासारख्या चित्रपटांमध्येही जान्हवी दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT