नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात विवाहासाठी किमान समान वय २१ वर्षे करण्याचा प्रस्तावित कायदा रखडला आहे. २०२० मध्ये या कायद्याची घोषणा झाली होती. विधेयकावर विचारविमर्षासाठी नेमलेल्या संसदेच्या स्थायी समितीने हा प्रस्ताव आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तसेच इन्स्टिट्यूट ऑफ आणंद रुरल मॅनेजमेंट या संस्थांकडे अधिक अध्ययनासाठी पाठविला आहे. टाटा इन्स्टिट्यूट या प्रस्तावाचा सामाजिक अंगाने, तर आणंद रुरल मॅनेजमेंट ग्रामीण अंगाने विचार करणार आहे.
ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील आदिवासी प्रथा बारकाईने समजून घेण्यासाठीही समिती दौरे करणार आहे.