Latest

james webb telescope : ब्रह्मांडाचं असं रूप जे कधीच उलगडलं गेलं नव्हतं…

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क: जेम्स वेब टेलिस्कोपने विश्वनिर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या काळाची काही छायाचित्रे घेतली असून ही दृश्ये प्रथमतःच मानवाला पाहायला मिळत आहेत. खगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असून विश्वनिर्मितीच्या अभ्यासाला यामुळे अधिक बळ मिळणार आहे. james webb telescope

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप जी ब्रह्मांडाच्या अभ्यासासाठी बनवलेली आहे तिने अगदी सुरुवातीच्या काळातील आकाशगंगांचे फोटो घेतले आहेत. युरोपियन स्पेस एजन्सी आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे डॅन को आणि टायगर हसियाओ तसेच टेक्सास विद्यापीठाच्या रेबेका लार्सन यांनी या टेलिस्कोपने MACS0647-JD या आकाशगंगांचे निरीक्षण करताना ही छायाचित्रे मिळवली आहेत. शास्त्रज्ञ ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या काळात आकाशगंगा कशा होत्या याचा अभ्यास करत असून विश्वनिर्मितीच्या कोडे उलगडण्यास तसेच ब्रह्मांडाच्या भविष्यातील प्रवासाबद्दल यातून अनेक अनुमान काढणे शक्य होणार आहे.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT