Latest

जालना लाठीमार: पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

अविनाश सुतार

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना गृह विभागाने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हयातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीमार केला होता. त्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

लाठीहल्ल्यानंतर झालेल्या दगरफेकीत ३२ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी रास्ता रोको व जाळपोळीचे प्रकार झाले. जिल्हयातील चार आगारातील २५० बसेस आगारात थांबून आहेत. मराठा आंदोलकांचा पोलिसांवरील रोष लक्षात घेउन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT