सुखापुरी : पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मेडिकल रजेवर गेलेल्या या अधिकाऱ्याची तडकाफडकी जालना येथील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याच्या आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गोंदी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यामधील संवादाची ही ऑडिओ क्लिप व्हायरस झाली आहे. या दोघांमध्ये प्रेमप्रकरणाची चर्चा आहे. कर्मचाऱ्यांनी फेसबुक लाईव्ह करून सोशल मीडियावर झालेल्या प्रकरणाची माहिती देखील दिली आहे. हे फेसबुक लाईव्ह काही वेळानंतर सायबर पोलिसांनी डिलीट केले. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याने पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली आहे. यावरून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा :