Latest

जळगाव : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेटवले, पतीविरुध्द खुनाचा गुन्हा

गणेश सोनवणे

जळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतप्त पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु.॥ येथे घडली. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत विवाहिता मीराबाई संतोष भील (वय 55) यांचा मृत्यू ओढवला तर आरोपी पती संतोष आखाडू भील हा देखील या घटनेत भाजला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु.॥ येथे संतोष व मीराबाई हे भिलाटी भागात वास्तव्यास होते. संतोष भील यास पत्नी मीराबाई हिच्या चारित्र्यावर संशय असल्याने दोघांमध्ये नेहमीच भांडण घडत होते. मीराबाई या बकरी बांधण्याच्या वाड्यात झोपल्या असतानाच आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

या घटनेत त्यांचा मृत्यू ओढवला तर संतोष हा देखील भाजला गेला. गावात घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. धरणगाव पोलिसांना माहिती कळवल्यानंतर यंत्रणेने धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला तर आरोपीला उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले. या प्रकरणी मयताचा मुलगा शिवदास संतोष भील याच्या तक्रारीवरून संतोष भिल याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT