Latest

Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

गणेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मध्यम ते हलका स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या दरम्यान शेतकऱ्यांनी पिकांची व शेती पिकांच्या उत्पादनांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. (Jalgaon Weather)

जिल्हयात पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच उघड्यावरील धान्य योग्यरित्या झाकून ठेवावे, पावसापूर्वी शक्य झाल्यास कापूस बोडांची वेचणी पूर्ण करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करुन जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात, हवामान अंदाजावर आधारीत कृषी सल्ला व हवामानाचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल ॲपचा वापर करावा, तसेच शेतकरी बंधूंनी मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT