Latest

Jalgaon News : लाखो मातीच्या दिव्यांपासून साकारली रामलल्लाची भव्य मूर्ती, पाहण्यासाठी लोटला जनसागर

गणेश सोनवणे

जळगाव : चाळीसगाव शहरात 10 हजार स्वेअर फुटात लाखो मातीचे दिवे वापरून प्रभू श्रीराम आणि राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी चाळीसगावात जनसागर लोटला आहे.

मातीच्या लाखो पणत्या… कलेचा अद्भुत संगम आणि हजारो हातांच्या परिश्रमातून प्रभू श्रीरामांची सुंदर अशी प्रतिकृती तयार करण्याची किमया जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावकरांनी करून दाखवली आहे. ही प्रतिकृती तब्बल 10 हजार स्वेअर फुटात साकारण्यात आली आहे. त्यासाठी मातीचे 2 लाख 10 हजार दिवे वापरण्यात आलेत. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलाय. ही कलाकृती पाहण्यासाठी चाळीसगावात लोकांनी गर्दी केली आहे.

संपूर्ण देशभरात मातीच्या दिव्यांचा वापर करून श्रीरामाची एवढी अवाढव्य प्रतिकृती कुणीही साकारलेली नाही. हा विश्वविक्रम जळगावच्या नावे असल्याचा दावा केला जातो आहे.

ही मूर्ती पाहण्यासाठी चाळीसगावात जनसागर लोटला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT