लतादीदींचा रामश्लोक पंतप्रधानांनी केला शेअर | पुढारी

लतादीदींचा रामश्लोक पंतप्रधानांनी केला शेअर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेला ‘माता रामो, मत्पिता रामचंद्र:’ हा अखेरचा रामरक्षा श्लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी शेअर केला.

बुध कौशिक ऋषींनी रचलेला हा श्लोक मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केला आहे. लतादीदींनी कोरोनाच्या काळात आपल्या घरातच या श्लोकाचे ध्वनिमुद्रण केले होते. अयोध्येत लतादीदींच्या स्मरणार्थ एक स्मारकही उभारण्यात आलेले आहे, हेही येथे उल्लेखनीय!

Back to top button