Latest

Jalgaon Crime : महिलांनीच महिलांना घेरले, दाग-दागिने घेऊन झाल्या पसार

गणेश सोनवणे

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सध्या शिवमहापुराण कथा सुरु आहे. दरम्यान शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी 20 ते 22 महिलांनी काही महिलांना घेरून त्यांच्या जवळील दाग-दागिने घेऊन पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तसेच कुऱ्हा पानाचे येथील सत्कार समारंभात ८१ हजार पाचशे रुपये लंपास झाले आहेत.

जरांगेंच्या सत्कार समारंभात…

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे या गावातील बस स्थानक चौकात (दि. ४) मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळेस मारहाण करून जबरदस्तीने खिशातील पाकीट मधील पंधरा हजार पाचशे व त्या ठिकाणी इतर ६६ हजार रुपये असे एकूण ८१ हजार पाचशे रुपये रोख रक्कम लंपास केले. याविरुद्ध राजू रूपचंद चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे हे तपास करीत आहेत.

शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी… 

तर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी बडे जटाधारी मंदिराजवळ वडनगरी फाट्याजवळ काही महिलांना २० ते २२ महिलांनी घेरले व त्यांच्या जवळील ९६ हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेऊन पसार झाल्या. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत हेमलता प्रकाश भावसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय नयन पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT